गो सेवा हिच खरी राष्ट्रसेवा -डॉ.मधु मानवतकर


भुसावळात डॉ. मानवतकर बहुउद्देशीय संस्थेतर्फे प्रज्ञासूर्य गोसेवा पुरस्काराचे वितरण

भुसावळ : गो मातेचे अनेक फायदे आहेत मात्र आपल्याकडे त्यांच्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. आजच्या पिढीतील काही तरुण गो सेवेचे काम करत असून गोसेवा हीच राष्ट्रसेवा असल्याचे सांगणे वावगे ठरणार नाही, असे प्रतिपादन डॉ.मानवतकर बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा डॉ.मधु राजेश मानवतकर यांनी केले. बुधवार, 4 सप्टेंबर रोजी श्रीराम मंदिरात डॉ. मानवतकर बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित प्रज्ञासूर्य गोसेवा पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक राधेश्याम लाहोटी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नंदग्राम गोशाळा अंजाळाचे अध्यक्ष संतोष नागला, जे.बी.कोटेचा, ब्रह्मानंद स्वामी, श्रीराम चौक, डॉ.राजेश मानवतकर उपस्थित होते.

गो सेवकांची संख्या वाढवणार -डॉ.मधू मानवतकर
डॉ.मधू मानवतकर पुढे म्हणाल्या की, पशुधन यामुळे अनेक फायदे होतात त्यामुळे त्यांची कत्तल रोखण्यात व आजारी गुरांना जीवदान देण्याचे काम भुसावळ शहरातील गोसेवक करीत आहे. भविष्यात गा ेसेवकांची संख्या वाढवून 500 पर्यंत करण्यावर भर दिले जाईल. गोसेवक निस्वार्थ भावनेने सर्व चांगले कार्य करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गोसेवक चंद्रशेखर जंगले, डॉ.भरत माळी, जिंतेद्र पवार, पंकज गिरनारे (कलाल), रोहित महाले, विशाल टाक, कृष्णा टाक, सोहम महाजन, सुमीत झांबरे, देंवेद्र चौहान, युवराज चौहान, देवेंद्र टाक, कुलदीप लोडते, किरण पाटील, पवन बाक्से, रोहित शेळके, अथर्व जोशी, विशाल घेंगट, संदीप करोसिया, आकाश टाकशंकर नकवाल, राहुल नरवारे, प्रशांत कुलकर्णी व शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा.प्रशांत नरवाडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांना सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसंगी राधेश्याम लाहोटी, ब्रह्मानंद स्वामी, प्रा.प्रशांत नरवाडे, रोहित महाले आदींनी विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन शिशीर जावळे यांनी केले. यशस्वीतेसाठी मनोज यादव, राजश्री सुरवाडे, शुभम जैन, शैलेश गायकवाड, देवेंद्र वराडे आदींनी परीश्रम घेतले.


कॉपी करू नका.