खान्देशातील सात पोलिस निरीक्षकांच्या बदल्या


जळगाव : जिल्ह्यात कालावधी पूर्ण केलेल्या खान्देशातील एकूण चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून तीन पोलिस निरीक्षकांच्या विनंती बदल्यांचे आदेश शुक्रवारी सायंकाळी नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.प्रताप दीघावकर यांनी काढले आहेत. दरम्यान तीन अधिकार्‍यांची विनंती बदली अमान्य करण्यात आली आहे.

या पोलिस निरीक्षकांच्या झाल्या बदल्या
धुळ्याचे प्रदीप दौलतसिंग पाडवी यांची नाशिक ग्रामीण, धुळ्याचे प्रकाश मुंडे यांची नाशिक ग्रामीण, जळगावचे राजेशसिंग चंदेल यांची नाशिक ग्रामीण, नंदुरबारचे संदीप रणदीवे यांची नाशिक ग्रामीणला बदली झाली आहे.

तीन निरीक्षकांच्या विनंती बदल्या मान्य
धुळ्याचे देविदास ढुमणे यांची नाशिक ग्रामीण तर धुळे येथीलच संजय सानप यांची नगरला तसेच जळगावचे दीपक बुधवंत यांची नंदुरबारला विनंती बदली मान्य करण्यात आली आहे.

तीन अधिकार्‍यांची विनंती बदली नाकारली
नगरचे विकास वाघ, धुळ्याचे दुर्गेश तिवारी व जळगावचे भीमराव नांदुरकर यांची विनंती बदली अमान्य करण्यात आली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !