पत्नीचा खून : वेरूळी खुर्दच्या आरोपी पतीला जन्मठेप


जळगाव : पत्नीच्या खून प्रकरणी पाचोरा तालुक्यातील वेरूळी खुर्द येथील रहिवासी रवींद्र सुपडू पाटील (38) यास जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या.आर.जे.कटारीया यांनी शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 7 सप्टेंबर ही घटना घडली होती. आरोपीने दारू न पिण्यासाठी पत्नी उमा यांनी विरोध केल्यानंतर आरोपी मध्यरात्री तिचा गळी आवळून तसेच विष पाजून खून केला होता. मयताच्या भावाने पाचोरा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला. सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी पुराव्याच्या आधारावर प्रखर युक्तीवाद करून आरोपीला जन्मठेपेचीच शिक्षा मिळावी म्हणून मागणी केली. न्यायालयाने समोर आलेले पुरावे व सरकारी वकीलांचे मुद्दे पाहता आरोपीला दोषी मानण्यात आले व त्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपीकडून अ‍ॅड.अविनाश जाधव यांनी बाजू मांडली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !