कार्यकर्त्यांमधूनच तयार होतो नेता : विजय पुराणिक
मुक्ताईनगर शहरात भाजपाची डॅमेज कंट्रोल बैठक : माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची अनुपस्थिती
मुक्ताईनगर : श्री.विजयजी पुरानिक यांनी समारोप भाषणात सांगितले की, भारतीय जनता पार्टीचा लहानात लहान कार्यकर्ता आमदार, खासदार मंत्री व मोठा नेता होऊ शकतो व हे केवळ भारतीय जनता पार्टीत शक्य आहे. काही घटना घडल्यास पक्ष कार्यकर्त्यांनी खचून जावू नये, असे मत भाजप प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणिक यांनी व्यक्त केले. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम केल्यानंतर भुसावळ विभागात गुरुवारी भाजपातर्फे डॅमेज कंट्रोल बैठकीचे खासदारांच्या कार्यालयात आयोजन करण्यात आले.
कार्यकर्त्यांनी एकजुटीने करावे काम : जिल्हाध्यक्ष
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीची संघटना मजबूत आहे व ती अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने एक दिलाने काम करणे गरजेचे आहे.
भाजपाचा विस्तार करणार : खासदार
प्रदेश चिटणीस खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, भाजपाचा विस्तार हा अधिक जोमाने काम करून करण्यात येईल त्यासाठी नवीन कार्यकर्ता सुद्धा जोडावे लागणार आहेत व ते आपण जोडू तसेच मला पक्षाने दोन वेळा खासदार बनवले, सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर मी खासदार झाल्याचे त्या म्हणाल्या.
जनसंघापासून भाजपाचे काम सुरू : डॉ.फडके
बेटी बचावो बेटी बढावोचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांनी सांगितले की, जनसंघापासून भारतीय जनता पार्टीचे काम चालू आहे. स्व.उत्तम नाना पाटील, कै.डॉ.अशोक फडके, चोपड्याचे माजी आमदार माधवराव पाटील असे अनेक पदाधिकारी जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तथा आमदार, खासदार अशा विपरीत परीस्थितीमध्ये निवडून आलेले आहेत.
यांची होती उपस्थिती
या बैठकीसाठी संघटन सरचिटणीस विजय पुराणिक, उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री किशोर काळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे, प्रदेश चिटणीस खासदार रक्षा खडसे, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, माजी प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, जि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सचिन पानपाटील, अनंतराव कुलकर्णी, मुक्ताईनगर नगरपंचायत गटनेता पियुष महाजन, उप गटनेता बबलू कोळी, नगरसेवक मुकेश वानखडे, नगरसेवक ललित महाजन, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सावळे, विनोद पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, युवा मोर्चा विधानसभा क्षेत्र प्रमुख दत्ता पाटील, बोदवड तालुका सरचिटणीस भगतसिंग पाटील, माजी सरचिटणीस कैलास वंजारी, नगरसेवक अनिल खंडेलवाल, भैय्या पाटील, सुधीर पाटील, चंद्रकांत कारले, उमेश पाटील, संतोष सोनवणे, संतोष देवकर, सोपान ताठे, डॉ.ब्रिजलाल जैन, पुंडलिक पाटील, राजेंद्र डाफसे, ईश्वर माळी, दीपक वाढे, ईश्वर पाटील, भगवान पाटील, प्रकाश बेलदार, राजू कुलकर्णी, सुरेश मंत्री, राजू घुले व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, माजी मंत्री गिरीश महाजन यांची अनुपस्थिती सर्वांनाच खटकली.

