सावदा सहा.निरीक्षक राहुल वाघ याची नाशिक ग्रामीणला बदली


सावदा : सावदा पोलिस ठाण्याचे सहा.निरीक्षक राहुल वाघ यांची जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्याने नाशिक ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अद्याप कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दीघावकर यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. राहुल वाघ यांनी सावद्यात कायदा व सुव्यवस्था चोख राखली तसेच अनेक गुन्ह्यांची उकलदेखील केली तसेच रोझोदा येथील दुहेरी हत्याकांडाचा यशस्वी तपास केला. कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना सतपंथ चॅरीटेबल ट्रस्टतर्फे कोरोना योद्धा म्हणून गौरवण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !