रावेर तालुक्यात अॅड.रोहिणी खडसेंनी घेतली कार्यकर्त्यांची भेट
रावेर : राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची कन्या तथा जिल्हा बँक अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे यांनी रावेर तालुक्यातील विविध गावांना भेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवेशा नंतर जिल्हा बँक अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे यांनी प्रथमच सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त तसेच कार्यकत्यांच्या भेटीसाठी रावेर तालुका गाठला. त्यांनी ऐनपूर, शिंगाडी, वाघाडी, खिर्डी खुर्द खिर्डी बु.॥, बलवाडी, सावदा, कोचुर खुर्द आदी ठिकाणी भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, संस्थाध्यक्ष संदीप भंगाळे, विलास पाटील, घनश्यामजी भंगाळे, रामकृष्ण कोल्हे, भास्कर भंगाळे, भरत लढे, डॉ.सुनील कोल्हे, नीळकंठ बढे, किरण नेमाडे, पवन चौधरी, गफूर कोळी, सतीश फेगडे, राजु महाजन तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

