सहावी प्रवेशासाठी नवोदय विद्यालय प्रवेशाचे अर्ज उपलब्ध


भुसावळ : साकेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयात सन 2021-22 मध्ये इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी होणार्‍या निवड चाचणीसाठी आवेदन पत्र व माहिती पत्रके उपलब्ध झाले आहेत. 22 ऑक्टोबरपासून ते 15 डिसेंबरपर्यंत www.navodaya.gov.in या साईटवर संबंधितांना नोंदणी करता येईल. चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना या निवड चाचणी परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन अर्ज करता येतील. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या माहितीसाठी जी.आर.सरनाईक, शैलेंद्रकुमार नागवंशी, पी.एस.कोवे यांच्याशी संपर्क करावा. ही परीक्षा 10 एप्रिल 2021 रोजी जिल्ह्यातील नियोजित परीक्षा केंद्रांवर होईल, असे प्राचार्य डॉ.आर.आर.खंडारे यांनी एका पत्रकान्वये कळवले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !