अमरावतीच्या प्राध्यापक तरुणीवर अत्याचार करणारा अभियंता जाळ्यात


भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी कणकवलीहून आवळल्या आरोपीच्या मुसक्या

भुसावळ : अमरावती येथील मूळ रहिवासी असलेल्या तरुणीशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री व प्रेमसंबंध वाढवत नंतर लग्नाचे आमिष देवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील पसार असलेल्या आरोपीस बाजारपेठ पोलिसांनी कणकवली (जि.सिंधूदुर्ग) येथून अटक केली आहे. निश्‍चय बसंत पालिवाल (26, पिपरीया, ता.होशंगाबाद, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीस 31 रोजी न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

लग्नाच्या आमिषातून अत्याचार
अमरावती येथील मूळ रहिवासी व जळगाव जिल्ह्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयात 26 वर्षीय तरुणी लेक्चरर म्हणून काम करीत असताना तिची निश्‍चय बसंत पालिवाल (26, पिपरीया, ता.होशंगाबाद, मध्यप्रदेश) या आरोपीशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यावेळी आरोपी मुक्ताईनगर तालुक्यातील एका डॅमवर साईड इंजिनिअर म्हणून कामाला होता. यावेळी आरोपीने प्राध्यापिका असलेल्या तरुणीशी ओळख वाढवत मैत्री केली व लग्नाच्या आमिषातून प्रेमसंबंध निर्माण करीत शारीरीक संबंधही प्रस्थापीत केले मात्र लग्न करण्यास आरोपीने नकार दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने अमरावती पोलिसात अत्याचार झाल्याप्रकरणी 6 ऑगस्ट 2020 रोजी गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचे कार्यक्षेत्र भुसावळ असल्याने हा गुन्हा (भाग पाच गुरनं.764/2020, भादंवि 376(2)(छ) ) भुसावळ बाजारपेठ पोलिसात वर्ग करण्यात आला होता.

कणकवली येथून आवळल्या मुसक्या
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीचे नेमके लोकेशन कळत नव्हते मात्र तो सिंधुदर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे एका डॅमवर साईड इंजिनिअर म्हणून कार्यरत असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाल्यानंतर त्यांनी हवालदार जितेंद्र पाटील, नाईक रमण सुरळकर, कॉन्स्टेबल चेतन ढाकणे आदींच्या पथकाने रवाना केल्यानंतर त्यांनी आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !