सर्वांच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार करणार


माजी मंत्री एकनाथराव खडसे : शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी हातावर बांधले घड्याळ

मुक्ताईनगर :  तब्बल 40 वर्ष भाजपा पक्ष वाढवण्यासाठी जीवापाड मेहनत घेतली व मिळालेल्या मंत्री पदाच्या माध्यमातून आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. आपल्या भागात केळी हे प्रमुख पीक असल्याने कृषी मंत्री असताना केळी पीक विम्याच्या निकषांमध्ये बदल करून केळी उत्पादकांना केळी पीक विम्याचा लाभ मिळवून दिला. केळी पिकावर संशोधन व्हावे आणि शेतकर्‍यांना कमी किंमतीत केळीची टिश्यू कल्चर रोपे उपलब्ध व्हावे यासाठी हिंगोणे, ता.यावल येथे केळी संशोधन केंद्र मंजूर केले होते त्याचबरोबर फळ संशोधन केंद्र, शासकीय पशु वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले होते. आता सरकारच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हे प्रकल्प पूर्णत्वास न्यायचे आहेत त्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात वाड्या वस्त्यावर विस्तार करून आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करणार असल्याचा आशावाद माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केला. सोमवारी निंभोरा स्टेशन, ता.रावेर, थोरगव्हाण, ता.यावल आणि यावल येथिल भाजपासह सहकार क्षेत्रातील विविध कार्यकर्त्यांनी भाजपाला रामराम करीत खडसेंच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून खडसे फार्म हाऊसवर झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीत प्रवेश केला. याप्रसंगी खडसे बोलत होते. जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांची उपस्थिती होती.

यांनी केला  राष्ट्रवादीत प्रवेश
निंभोरा स्टेशन येथील भाजप शहराध्यक्ष प्रभाकर शंकर सोनवणे, सचिन महाले, मुन्ना पिंजारी, आरीफ खान, जितेंद्र सोनवणे, अविनाश संतोष भालेराव, युगल धनराज राणे, वैभव अनंता भोगे, चेतन रवींद्र नेमाडे, प्रतीक नितीन भंगाळे, पूर्वेश युवराज बोरसे, हितेश शंकर चौधरी, किरण अनिल कोंडे, जयेश कैलास चौधरी, मोहन गिरधर भंगाळे, गिरीश रमेश नेहते, गुणवंत नेमचंद्र भंगाळे, अभिजीत जोशी, संदीप खाचणे, विशाल तायडे, आरिफ खान बाबु खान, मुन्ना पिंजारी, सुधाकर भंगाळे, जितेंद्र सोनवणे, दिपक सोनवणे, रवी भोगे, राज खाटीक, प्रशांत काठोके, भुवन बोरोले, चेतन बोरनारे, चेतन भंगाळे, शंकर बोरोले, मनोहर तायडे, किशोर चौधरी, सचिन कोळी, रतन वाघ, शाहरुख खान, राकेश सपकाळे, सुभाष पाटील संदीप कोळी, अक्रम शेख तसेच थोरगव्हाण येथील बापू पाटील, विकास शालिक पाटील, किशोर पाटील, विलास सदाशीव पाटील, धनसिंग पाटील, जुलाल पाटील, कैलास पाटील, सचिन पाटील, रमेश मुरलीधर चौधरी तसेच यावल येथील मधुकर चौधरी, किशोर वानखेडे, अनिल कोलते, मांगो मेंबर, धनराज फालक, भुषण चौधरी, काशिनाथ कोळी, जयंत चोपडे आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

यांची होती उपस्थिती
यावेळी बोदवड बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोडे, दुर्गादास पाटील, बी.सी.सेल तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, माजी सभापती राजू माळी, तालुका उपाध्यक्ष संदीप खाचणे, वाय.डी.पाटील, दूध संघ संचालक सुभाष टोके, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस अरुण पाटील, बाळू शिंपी, कमलाकर पाटील, सुभाष खाटीक, सुनील काटे, पांडुरंग नाफडे उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !