वरणगावातील मंजूर पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात करा


माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे जिल्हाधिकार्‍यांना साकडे

भुसावळ : वरणगाव शहरवासीयांसाठी मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे सोमवार, 2 रोजी केली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, कामगार नेते मिलिंदजी मेंढे, माजी सभापती राजेंद्र पुंडलिक चौधरी व इरफान पिंजारी, आकाश निमकर, अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, संदीप भोई आदींची उपस्थिती होती. वरणगावकरांना 24 तास पाणी मिळण्यासाठी 13 सप्टेंबर 2019 रोजी 25 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री गिरीष महाजन यांच्या प्रयत्नानंतर मंजूर केली होती.

समांतर महामार्गाचे काम करण्याची मागणी
वरणगाव शहराबाहेरून नवीन महामार्ग जात असल्याने साईबाबा मंदिर ते फुलगाव फाटादरम्यान नवीन महामार्गार चढण्यासाठी व उतरण्यासाठी सर्व्हिस रस्ता तयार करून कठोरा गावाकडे व वरणगाव शहरात व आयुध निर्माणीकडे नवीन महामार्गावरून ये-जा करण्यासाठी दोन जंक्शन करण्यात यावे तसेच वरणगाव शहरातून समांतर महामार्गासाठी 70 कोटी केंद्र सरकारने मंजूर करून दिले असून त्या मंजूर समांतर महामार्गाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणीही याप्रसंगी माजी मंत्री गिरीष महाजन, वरणगावचे माज नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, कामगार नेते मिलिंद मेढे, माजी सभापती राजेंद्र पुंडलिक चौधरी, इरफान पिंजारी, अ‍ॅड.ए.जी जंजाळे, आकाश निमकर, संदीप भोई यांनी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !