भुसावळातील युवकाचा पोहताना बुडाल्याने मृत्यू


भुसावळ : शहरातील सरस्वती नगरातील रहिवासी लकी आलफेट बाटले (23) या युवकाचा तापी नदीवर पोहताना बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना
मंगळवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात संदीप शिवराम कलाल यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शहरातील सरस्वती नगरातील रहिवासी लकी हा मंगळवारी सायंकाळी तापी नदीवरील इंजिन घाट येथे मित्रांसोबत पोहण्यास गेला होता. यावेळी पाण्यात बुडत असताना त्याच्या मित्रांनी आरडा-ओरड केली व तत्काळ तिथे पोहण्यास आलेले काही लोक गोळा झाल्यानंतर त्यांनी लकीला बाहेर काढले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी हवालदार मोहम्मद वली सय्यद, जाकिर सय्यद, मोहन पाटील यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव येथे हलवला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !