शिंगाडीसह सिंगत ग्राम पंचायतींना बीडीओंची सरप्राईज व्हिजीट
ग्रामसेवकांमध्ये उडाली खळबळ : तक्रारींची केली चौकशी
रावेर : रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी तालुक्यातील शिंगाडी, सिंगत ग्रामपंचायतींना अचानक भेट देत ग्रामपंचायत स्तरावरील योजनांचा आढावा घेत रेकॉर्ड तपासले.
तक्रारींची केली चौकशी
रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी आज अचानक शिंगाडी व सिंगत ग्रामपंचायतीला सरप्राईज व्हिजीट दिल्यानंतर ग्रामपंचायत स्तरावर चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी गटविकास अधिकारी कोतवाल यांनी सिंगत येथील सार्वजनिक शौचालयाबाबत आलेल्या तक्रारींची चौकशी केली तसेच दोन्ही गावांचे ग्राम पंचायत स्तरावरील विविध योजनांची माहिती घेतली. ड यादीत नावे असलेल्या कुटुंबाचे आधार अपडेशनबाबत ग्राम सेवकांकडून आढावा घेतला तसेच गावातील नागरीक घराबाहेर निघतांना मास्क वापरण्याचे आवाहन कोतवाल यांनी केले. यावेळी त्यांच्या सोबत विस्तार अधिकारी डी.एस.तडवी, शाखा अभियंता डी.आर.महाजनदेखील होते.

