रीगावच्या बालकाचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू
कुर्हाकाकोडा : येथून जवळ असलेल्या रीगाव येथील सुमित संतोष मेहंगे (15) या बालकाचा मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास विहिरीत पाय घसरून पडल्यामुळे मृत्यू झाला. मुलाचे वडील व काका त्यांच्या शेतात काम करत असताना सुमित व त्याचा चुलत भाऊ विशाल खेळत त्यांच्या शेताजवळील लागून असलेल्या खामखेडा येथील शेतकरी विनोद सोनवणे यांच्या विहिरीजवळ गेले असता अचानक सुमितचा विहिरीजवळ पाय घसरला व तो पाण्यात पडला. त्याचे वडील व काका विहिरीजवळ धावून विहिरीत उडी टाकून सुमितला बाहेर काढले व खाजगी वाहनाने कुर्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टरांनी तपासून सुमितला मयत घोषित केले.

