भुसावळातील रस्त्यांची दर्जेदार कामे व्हावीत
कृउबा सभापती सचिन चौधरी : निकृष्ट कामांच्या चौकशीची मागणी
भुसावळ : शहरातील विविध भागात पालिकेतर्फे रस्त्यांची कामे होत असून ही कामे दर्जेदार पद्धत्तीने करावीत, अशी मागणी भुसावळ कृउबाचे सभापती सचिन चौधरी यांनी पालिका प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली. चौधरी यांच्या तक्रारीनुसार, भुसावळातील नागरीकांनी त्यांना व्हाट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून भुसावळ शहरात निकृष्ट पद्धत्तीने रस्त्यांची कामे होत असल्याची तक्रार केली असून या कामांची चौकशी करावी तसेच कारवाई करावी, अशी मागणी चौधरी यांनी भुसावळचे मुख्याधिकारी संदीप चिद्रेवावर तसेच पालिकेचे अभियंता तोष्णीवाल यांच्याकडे केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते तथा नगरसेवक दुर्गेश ठाकूर उपस्थित होते.

