दोडे गुर्जर समाजातील पहिलाच ऑनलाईन वधू-वर परीचय मेळावा 8 व 9 रोजी
यावल : दोडे गुजर समाजातील पहिलाच ऑनलाईन वधू-वर परीचय मेळावा 8 व 9 रोजी दुपारी तीन ते सहा या कालावधीत झूम अॅपसह यु ट्यूब अॅपवर होणार आहे. या मेळाव्यात 104 विवाहोच्छूक मुले-मुली आपला परीचय देणार असून कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्यात सहभागाचे आवाहन
समाज बांधवांनी या मेळाव्यात हिरारीने सहभाग घेऊन आपल्या कुटुंबातील, नात्यातील परीसरातील, गावातील तसेच शहरातील उपवर मुला-मुलींना या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आग्रह करावा तसेच या कार्यक्रमाचे आयोजन समाजातील उपवर मुला-मुलींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अॅड.भगवान पाटील, गजानन पाटील, संजय पाटील, अविनाश पाटील, डी.के.पाटील, शरद पाटील, प्रदीप पाटील, अनिल पाटील तसेच अॅड.शीतल चौधरी, डॉ.भाग्यश्री पाटील यांनी केले आहे. दोडे गुजर समाजातील सर्व युवक-युवतींनी या उपक्रमासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन दोडे गुजर समाजातर्फे करण्यात आले आहे.

