आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात निघणार महामोर्चा


भुसावळ शहरात शहर शिवसेनेची नियोजन बैठक

भुसावळ : शहरातील रेल कामगार सेनेच्या कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने तालुकाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहर शिवसेनेची बैठक झाली. केंद्र शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरोधात हजारोंच्या संख्येत बाईक रॅली काढण्याच्या नियोजनार्थ बैठकीचे आयोजन करण्यात आले. नीलकंठ फालक, प्रा.धिरज पाटील, बबलू बर्‍हाटे, दीपक धांडे, श्याम श्रीगोंदेकर, कैलास लोखंडे, निर्मल दायमा, देवेंद्र पाटील, अबरार ठाकरे, पवन नाले, नरेंद्र लोखंडे, सोनी ठाकूर, गोकुळ बाविस्कर, मनोज पवार, मेहमूद शेख, पिंटू भोई, सुरज पाटील, मोहसीन तडवी, प्रदीप भुसार, आमिर पठाण, नबी पटेल व कार्यकर्ते उपस्थित होते. कृषी विधेयकास विरोध म्हणून 16 ते 17 विषय हातात घेवून रावेर लोकसभेतील प्रत्येक तालूक्यातून हजारोंच्या संख्येत बाईक रॅली आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार असून त्याकरीता शिवसेनेचे मंत्री तसेच ज्येष्ठ शिवसेना नेते या मोर्चाप्रसंगी उपस्थित राहणार असल्याचे माजी नगरसेवक दीपक धांडे म्हणाले. सूत्रसंचालन देवेंद्र पाटील तर आभार प्रदर्शन बबलू बर्‍हाटे यांनी मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !