दुचाकी घसरल्याने अपघात : पत्नीचा मृत्यू, पती जखमी


पाडळसा गावाजवळील पाटचारीजवळ अपघात : काकांच्या उत्तरकार्यास जातांना विवरेच्या राणे कुटुंबावर ओढवली आफत

फैजपूर : यावल तालुक्यातील पाडळसे गावाजवळील पाटचारीजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात पत्नीचा मृत्यू झाला तर पती जखमी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली. या घटनेने विवरे गावावर शोककळा पसरली आहे. अपघात प्रकरणी फैजपूर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली. या अपघातात तृप्ती राणे (36) या विवाहितेचा मृत्यू ओढवला तर त्यांचे पती गणेश राणे हे जखमी झाले.

उत्तर कार्यास जाताना झाला अपघात
विवरे, ता.रावेर येथील रहिवासी असलेले गणेश भागवत राणे (46) व त्यांच्या पत्नी तृप्ती या दुचाकीने काकांच्या उत्तरकार्याच्या कार्यक्रमासाठी जळगावकडे निघाले होते मात्र पाडळसे गावाजवळील पाटचारीजवळ दुचाकी स्लीप होवून झालेल्या अपघातात तृप्ती राणे यांना डोक्याला जबर दुखापत झाली तर गणेश राणेे यांनादेखील हाता-पायाला जबर दुखापत झाली. अपघातस्थळावरून दोघांना तत्काळ भुसावळ येथे गिरजा हॉस्पिटल व नंतर खाजगी रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच तृप्ती राणे यांचा मृत्यू झाला. राणे यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला असता वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन केले. या अपघात प्रकरणी फैजपूर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. राणे यांच्या अशा अपघाती विवरे गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !