लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र पूर्णत्वासाठी पाठपुरावा करणार


माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे : वडाळा-वडाळी गावातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुक्ताईनगर : पाटबंधारे मंत्री असताना चाळीसगाव तालुक्यात आणि परीसरात अनेक लहान-मोठी धरणे मंजुर केली त्यामुळे तालुक्यात बागायती क्षेत्र वाढले, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला, कृषी मंत्री असताना लिंबू वर्गीय फळ संशोधन केंद्र मंजूर केले असू ते पूर्णत्वास न्यायचे आहे त्यासाठी मी परत पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही माजी महसूल मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी येथे दिली. चाळीसगाव तालुक्यातील वडाळा-वडाळी गावातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. खडसे म्हणाले की, आगामी काळात सर्वांनी पक्ष वाढीसाठी मेहनत घ्यायची आहे आणि येत्या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विजयी पताका फडकवायची आहे.

कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
चाळीसगाव तालुक्यातील वडाळा वडाळी येथील भाजपा पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते तसेच सहकार क्षेत्रातील पदाधिकार्‍यांनी गुरुवारी मुक्ताईनगर येथे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश
याप्रसंगी माजी सरपंच नारायण हरी अहिरराव, हिलाल देवराम अहिरराव, युवराज कौतीक अहिरराव, दत्तू मधुकर पाटील, संजय हिंमत अहिरराव, विकास मधुकर आमले, हिरकणाबाई पाटील, गायत्री पाटील, लक्ष्मीबाई पाटील, रंजना पाटील, अनिता पाटील, आशाबाई पाटील, संगीता पाटील, किशोर आमले, भोजराज आमले, शिंपी सर, कुणाल पाटील, सतीश पाटील या प्रमुख पदाधिकार्‍यांसह त्यांच्या सुमारे शंभर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेल प्रदेश चिटणीस मनिष आमले, सरपंच अशोक आमले, बोदवड बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी सभापती राजू माळी, विलास धायडे, सुनील काटे, रुपेश भोसले, निरज आमले, शिवराज पाटील, योगेश कोलते, पांडुरंग नाफडे उपस्थित होते.

रावेर शहरातील कार्यकर्त्यांनी केला प्रवेश
रावेर : खडसेंच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून रावेर शहरातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शहराध्यक्ष महेमूद शेख इरफान शेठ, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष इम्रान खान यांनी पक्षात प्रवेश दिला. राष्ट्रवादीच्या बैठकीत राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पाटील, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गोटू शेट, शेख सलिम, गयास्सुदीन काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर शहरातील असंख्य कार्यकर्त्यांना शहराध्यक्ष महेमुद शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश दिला. यात मनसे अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष सईद खान यांच्यासह हसन खान, सत्तार खान, मोसीम खान, अब्दुल करीम, शेख दाऊत यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !