भुसावळातील अल्पवयीन तरुणीला पळवले : दोन वर्षानंतर आरोपी जाळ्यात
भुसावळ : शहरातील एका भागातील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीला पळवून नेल्याची घटना मे 2018 मध्ये घडली होती. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात संशयीत आरोपी रईस खान साकिम खान (32, रा.कलाली वाडा, जाममोहल्ला, भुसावळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता मात्र गुन्हा घडल्यानंतर आरोपी पसार झाला होता. आरोपी भुसावळात आल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी शुक्रवारी त्यास जाम मोहल्ला भागातून अटक केली.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक अनिल मोरे व सहा.पोलिस निरीक्षक मंगेश गोटला, सहा.फौजदार तस्लिम पठाण, हवालदार सुनील जोशी, संजय भदाणे, समाधान पाटील, रवींद्र बिर्हाडे, किशोर महाजन, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख, सचिन चौधरी, सुभाष साबळे, चेतन ढाकणे योगेश महाजन आदींच्या पथकने केली. तपास सहा.निरीक्षक अनिल मोरे, नाईक समाधान पाटील करीत आहेत.

