रेल्वे प्रवाशांना दिलासा : पाच विशेष गाड्या


आरक्षित तिकीट असलेल्या रेल्वे प्रवाशांनाच मिळणार प्रवेश : कोविड नियमांचे पालन रेल्वे प्रवाशांना बंधनकारक

भुसावळ : आगामी दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे गाड्यांना होणारी रेल्वे प्रवाशांची गर्दी पाहता गैरसोय टाळण्यासाठी मुंबई-सहरसा, मुंबई-समस्तीपूर आणि पुणे-मुझफ्फरपूर दरम्यान चार विशेष एकेरी गाड्या तर एलटीटी-समस्तीपूर उत्सव विशेष गाडी चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या रेल्वे गाड्या संपूर्णपणे आरक्षित असून आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच या गाड्यांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. भुसावळ विभागातून या गाड्या धावणार असल्याने या भागातील प्रवाशांची मोठ2ी सोय होणार आहे.

एलटीटी-समस्तीपूर उत्सव विशेष गाडी
डाऊन 01021 लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपूर विशेष गाडी 11 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबरदरम्यान दर बुधवार व शनिवारी एलटीटीवरून 4.40 वाजता सुटल्यानंतर तिसर्‍या दिवशी पहाटे चार वाजता समस्तीपूरला पोहोचणार आहे. अप 01022 समस्तीपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी 13 ते 30 नोव्हेंबरदरम्यान दर शुक्रवार व सोमवारी समस्तीपूरहून 9.50 वाजता सुटल्यानंतर तिसर्‍या दिवशी पहाटे 6.40 वाजता एलटीटीला पोहोचणार आहे. या गाडीला नाशिक, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मानिणपूर, प्रयागराज, छोइकी, पंडित दिनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, पाटलीपुत्र, हाजीपूर, मुजफ्फरपूर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक एसी टू टीयर, चार एसी थ्री टीयर, 12 स्लीपर क्लास व तीन सेकंड क्लास स्लीपर बोगी जोडण्यात येणार आहेत. 8 नोव्हेंबरपासून आरक्षण सुविधा सुरू होणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस-सहरसा वन वे स्पेशल
डाऊन 02151 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस-सहरसा ही विशेष गाडी 9 नोव्हेंबर रोजी दहा वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी सहरसा येथे रात्री 8.15 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छेओकी, पं.दीनदयाल उपाध्याय, पटना आणि खगेरीया स्थानकावर थांबा देण्यात येणार आहे. या गाडीला दोन एसी थ्री टायर, 10 स्लीपर क्लास आणि 7 द्वितीय श्रेणी सिटींग डबे जोडण्यात येणार आहेत.

मुंबई-सहरसा वन वे स्पेशल
डाऊन 02153 विशेष गाडी 9 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दोन वाजता सुटल्यानंतर तिसर्‍या दिवशी 12.45 वाजता सहरसा येथे पोहोचणार आहे. या गाडीला दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छेओकी, पं.दीनदयाल उपाध्याय, पटना आणि खगेरीया स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दोन एसी थ्री, 10 स्लीपर क्लास आणि 7 द्वितीय श्रेणी सिटींग डबे जोडण्यात येणार आहेत.

पुणे-मुझफ्फरपूर वन वे स्पेशल
डाऊन 01153 विशेष गाडी पुण्याहून 9 रोजी 3.50 वाजता सुटल्यानंतर तिसर्‍या दिवशी 03.10 वाजता मुझफ्फरपूरला पोहोचणार आहे. या गाडीला अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छेओकी, पं.दीनदयाल उपाध्याय जंक्शन आणि पाटलीपुत्र स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दोन एसी थ्री टायर, 11 स्लीपर क्लास आणि 10 सेकंड क्लास सीट डबे जोडण्यात येणार आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपूर वन वे स्पेशल
डाऊन 02157 लोकमान्य टिळक टर्मिनसहुन 9 नोव्हेंबर 8.35 वाजता सुटल्यानंतर तिसर्‍या दिवशी समस्तीपूरला पाच वाजता पोहोचणार आहे. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छेओकी, पं.दीनदयाल उपाध्याय जंक्शन, पाटलीपुत्र, हाजीपूर आणि मुजफ्फरपूर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दोन एसी थ्री टायर, 10 स्लीपर क्लास आणि 7 द्वितीय श्रेणी सिटींग डबे जोडण्यात येणार आहेत. चारही आरक्षित विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कावरील बुकिंग 7 नोव्हेंबर रोजी सर्व संगणकीय आरक्षित केंद्रांवर आणि रेल्वेच्या संकेतस्थळावर बुकींग करता येणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !