रावेरात वीज कंपनीसह कृषी विभागाच्या प्रश्‍नांवर गाजली आढावा बैठक


रावेर : रावेर पंचायत समितीतील अधिकार्‍यांचा प्रभारीराज तसेच महावितरण आणि कृषी विभागाच्या विविध प्रश्‍नांवर शुक्रवारी रावेर पंचायत समितीची आढावा बैठक चांगलीच गाजली. सभापती जितु पाटील अध्यक्षस्थानी होते. या बैठकीला उपसभापती जुम्मा तडवी, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील कविता कोळी, धनश्री सावळे, रुपाली कोळी यांची उपस्थिती होती तर पी.के.महाजन, प्रतिभा बोरोवले, माधुरी नेमाडे, योगीता वानखेडे, अनिता चौधरी यांची अनुपस्थिती राहिली. बैठकीचे कामकाज गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी पाहिले..

या विभागाच्या अधिकार्‍यांची उपस्थिती
पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीला पाणीपुरवठा विभाग, सिंचन विभाग, जिल्हा परीषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, शालेय पोषण आहार, पशुसवंर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते तर पुनर्वसन विभाग व तालुका कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी बैठकीला दांड्या मारल्या.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !