भुसावळात विद्युत इंजिन कारखान्यातर्फे 15 डिसेंबर रोजी पेन्शन अदालत
भुसावळ : विद्युत इंजिन कारखाना, कारखाना लेखा अधिकारी कार्यालय आणि वरिष्ठ सामग्री प्रबंधक कार्यालय, मध्य रेल्वे भुसावळ यांच्यातर्फे सेवानिवृत रेल्वे कर्मचार्यांना अंतिम भुगतान न मिळाल्या बाबतच्या प्रश्नावर विचार विमर्श करण्यासाठी विद्युत इंजि कारखान्यात मंगळवार, 15 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त कर्मचार्यांनी त्यांचे अर्ज मुख्य कारखाना प्रबंधक, विद्युत इंजन कारखाना, मध्य रेल्वे, भुसावळ यांच्या कार्यालयात तीन प्रतिंसह पाठवाव्यात. या अर्जात सेवानिवृत्त कर्मचार्याचे नाव आणि पत्ता, सेवानिवृत्तीच्या वेळी असलेला हुद्दा, सेवानिवृत्तीची तारीख आणि सेवानिवृत्तीचे कारण, समस्यांविषयी संक्षिप्त तपशील. बँकेचे नाव व खाते क्रमांक, अंतिम वेतन आणि वेतनमान, पीपीओ क्रमांक, टोकन नंबर व पी.एफ.नंबर, पॅन व मोबाइल नंबर तसेच आधार क्रमांकाचा उल्लेख करावा, असे कळवण्यात आले आहे.

