सावद्यात सहा.निरीक्षक देविदास इंगोले यांनी पदभार स्वीकारला


सावदा : सावद्याचे सहा.निरीक्षक राहुल वाघ यांची नाशिक ग्रामीणला बदली झाल्यानंतर त्यांच्या रीक्त जागी नाशिक येथील भद्रकाली पोलिस ठाण्याहून बदलूने आलेले सहा.निरीक्षक देविदास इंगोले यांची बदली करण्यात आली. त्यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. पोलिस स्टेशनची धुरा सांभाळताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत जनतेत समन्वय ठेवण्याची महत्वपूर्ण भूमिका निभावणार असून सर्वसामान्य नागरीकांमध्ये पोलिस दलाविषयी आदर निर्माण करून अप्रिय घटना रोखण्यासाठी पोलिस दलाचे कसोशीने प्रयत्न असतील शिवाय गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटेल या पद्धत्तीने काम करणार असल्याचे इंगोले म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !