केळी पीक विम्याबाबत राज्य सरकारनेच नुकसान केले
खासदार रक्षा खडसे यांचा दावा : यावलमध्ये पदाधिकार्यांची बैठक
यावल : जून महिन्यातच केळी विमा निकष ठरवून राज्य सरकारनेच शेतकर्यांचे नुकसान केले असून केळी उत्पादन करणार्या जळगाव जिल्ह्यातील कृषी अधिकार्यांसह तज्ज्ञांना बोलावण्यात आले नाही त्यामुळे आता पूर्वीचे निकष लावण्याच्या मागणीसाठी 9 नोव्हेंबर रोजी भाजपकडून शेतकरी सहभागातून मोठे आंदोलन करणार असल्याचे खासदार रक्षा खडसे यांनी येथे सांगितले. बाजार समिती सभागृहात शुक्रवारी भाजप पदाधिकारी व शेतकर्यांची बैठक झाली. त्यात केळी विम्याचे पूर्वीचे निकष कायम ठेवण्याच्या मागणीसाठी 9 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजपतर्फे महामोर्चाचे आयोजन केल्याची माहिती खासदारांनी दिली.
यांची होती उपस्थिती
या बैठकीस जि.प.सभापती रवींद्र पाटील, हर्षल पाटील, जि.प. सदस्य सविता भालेराव, सुरेश धनके, कृषिभूषण नारायण चौधरी, मसाका चेअरमन शरद महाजन, नरेंद्र नारखेडे, उमेश पाटील, प्रमोद नेमाडे, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, विलास चौधरी, उजैन्नसिंग राजपूत, उमेश फेगडे, डॉ.नीलेश गडे, गोपालसिंग पाटील, सागर कोळी आदींची उपस्थिती होती.
काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरींनी सोबत यावे
केळी उत्पादक शेतकर्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न केळी विमा आहे. यात नव्याने लावलेल्या निकषामुळे केळीचे नुकसान होवुन देखील शेतकर्यांना लाभ मिळणार नाही. तेव्हा निकष बदल करण्यासाठी रावेरवचे आमदार शिरीष चौधरी यांनीही आमच्यासोबत आंदोलन करावे, असे खासदार खडसे म्हणाल्या.

