आदिवासी विकास मंत्री के.सी पाडवी यांचा मुक्ताईनगर काँग्रेसतर्फे सत्कार
मुक्ताईनगर : मुक्ताईनगरातील शासकीय विश्रामगृहावर महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अॅड.के.सी.पाडवी व रावेर आमदार शिरीष चौधरी यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तालुक्यामधील आदिवासी, पावरा, बंजारा आदी तालुक्यातील आदिवासी मागासवर्गीय जातींना न्याय देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे आदिवासी मंत्री पाडवी यांनी आश्वस्त केले. तालुक्यातील पक्ष संघटन, वाढनारी लोकप्रियता याचे यांनी कौतुक केले.
यांची होती उपस्थिती
आमदार शिरीष चौधरी, जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, जिल्हा सचिव आसीफ खान, ईस्माईल खान, तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, उपाध्यक्ष दिनकर भालेराव, प्रा.एस.डी.पाटील, मागास वर्ग जिल्हा उपाध्यक्ष बी.डी.गवई, शहराध्यक्ष प्रा.पवन खुरपडे, शकुर जमादार, यासीन खान, वाय.सी.चौधरी, सुरेश भोलाणे, युवक विधानसभा अध्यक्ष नीरज बोराखेडे, शकील आझाद, आनंद कोळी, माजी युवक अध्यक्ष अतुल जावरे, निसार अली, अॅड.कुणाल गवई, अनिल सोनवणे, संजय धामोळे, संतोष कोळी, पवन कांडेलकर, अमोल पाटील, सादीक खाटीक, निखील चौधरी, शुभम तळेले, जमाल शहा, अकील शहा, अक्षय काठोके, फिरोज टेलर, राहील खान, अमोल जैन, शिव कोळी, महेश खुळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

