भुसावळात किल्ले बनवा स्पर्धा : विद्यार्थ्यांना सहभागाचे आवाहन
भुसावळ : राष्ट्रवादीचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर शहरातील विद्यार्थ्यार्ंसाठी किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धकांनी आपण बनवलेल्या किल्याचा फोटो व आपले नाव मोबाईल 8830223509 या व्हाटसअॅप क्रमांकावर 13 नोव्हेंबरपर्यंत पाठवावे, असे आवाहन ठाकूर यांनी केले आहे. 16 रोजी बक्षीस वितरण समारंभ होणार असून प्रथम विजेत्याला 3100, द्वितीय विजेत्याला 2100 व तृतीय विजेत्याला 1100 रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी केले आहे.

