भुसावळात आयशर रीक्षावर धडकली : रीक्षा चालकाचा मृत्यू
भुसावळ : भरधाव आयशर रीक्षावर आदळून झालेल्या रीक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान हा अपघात खडका-भुसावळ रोडवरील इंडियन ऑईल पेट्रोलपंपासमोर झाला. या अपघातात ईस्माईल मुनाफ पिंजारी (51, रा. लाल बिल्डींग परीसर, भुसावळ) या रीक्षा चालकाचा मृत्यू झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, भुसावळ शहर ते खडका
मार्गावरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर भुसावळकडून खडक्याकडे भरधाव भरधाव जाणारा आयशर (एम.एच.04 ई.वाय.9608) ने खडकाकडून भुसावळातील लाल बिल्डींग भागात जाणारी रीक्षा (एम.एच.19 व्ही.0408) ला समोरून धडक दिली. या अपघातात आपला मुलगा व भाच्याला रीक्षातून घेवून जाणारे री क्षा चालक ईस्माईल मुनाफ पिंजारी (51, रा.लाल बिल्डींग परीसर, भुसावळ) यांचा जागीच मृत्यू झाला तर मयत पिंजारी यांचा त्यांचा 18 वर्षाचा मुलगा आबीद ईस्माईल पिंजारी तसेच भाचा अमिन कासम पिंजारी (17, रा. मुस्लिम कॉलनी) व हे दोन्ही किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर आयशर चालक पसार झाला. दोघा जखमींवर नगपालिका रुग्णालयात प्रथमोचार करण्यात आले तर मृत इस्माईल पिंजारी यांचा मृतदेह वरणगाव येथे शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. दरम्यान, अपघातामुळे खडकारोडवरील वाहतूक विस्कळीत झाल्याने प्लॉट भागातून वाहतूक वळविण्यात आली. खडक्याचे उपसरपंच रईस लोधी, मुजीब काझी, शेख रफिक, शेख मुबीन, रोशन शहा यांनी जखमीना भुसावळ येथील नगरपालिकच्या दवाखान्यात हलवण्यासाठी मदत केली. तालुका पोलिस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलिस निरीक्षक रुपाली चव्हाण, हवालदार प्रेमचंद सपकाळे, मोनी पाटिल यांनी घटनस्थळी धाव घेतली.

