भुसावळातील नागरीक सुज्ञ व समाजसेवी
रोटरी रॉयल्सच्या कार्यक्रमात पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांचे प्रतिपादन
भुसावळ : भुसावळात बदली होऊन येतांना गुन्हेगारांचे शहर असे ऐकले होते परंतु येथील जनता समाजसेवी व सुज्ञ असल्याचा प्रत्यय आल्याचे प्रतिपादन भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्सच्या कार्यक्रमात केले. भुसावळ येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्सचा पदग्रहण समारंभ रोटरी हॉलमध्ये रविवारी झाला. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे बोलत होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर भुसावळ नगरपालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार, जळगाव रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष रो.गनीभाई मेमन, रोटरी माजी प्रांतपाल रो.राजीव शर्मा, स.गव्हर्नर धर्मेंद्र मेंडकी, माजी रोटरी भुसावल रॉयल्स चे नवनियुक्त अध्यक्ष रो.उमेश नेमाडे, सचिव रो.राजेंद्र यावलकर उपस्थित होते.
कोरोना योद्ध्यांचा सन्मान
यावेळी रोटरी क्लब ऑफ भुसावल रॉयल्सच्या नूतन पदाधिकारी यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत चार्टर प्रमाणपत्र देऊन पदग्रहण सोहळा झाला. त्यानंतर शहरातील कोरोना काळात महत्त्वपूर्ण कार्य केलेल्या परंतु प्रसिद्धीपासून कोसो दूर असलेल्या निवडक डॉक्टर, कर्मचारी, नगरपरीषद अधिकारी, वाहनचालक, समाजसेवक आदींचा कोरोना योद्धा म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
भविष्यात मोठे प्रकल्प राबवणार : उमेश नेमाडे
यावेळी बोलतांना माजी प्रांतपाल रो.राजीव शर्मा यांनी बोलतांना रोटरी चे कार्य व संकल्पना विषयी माहिती सांगितली तर रो.धर्मेंद्र मेंडकी यांनी विद्यमान प्रांतपाल रो.शब्बीर शकिर यांचा संदेश वाचला. नूतन अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी भुसावळ रॉयल्स ग्रुपच्या स्थापनेचे उद्देश सांगून कोरोना लॉकडाऊन काळात क्लब मार्फत पेशंटसाठी मोफत वाहन सेवा, पोस्ट कर्मचारी तसेच बाजारातील दुकानदार व ग्राहकांना मास्क व सॅनिटायझर वाटप, धान्य वाटप, रक्तदान शिबिर, बाजारपेठ पो.स्टे. ला सॅनिटायझर टनेल आदी विविध प्रकारची समाजसेवा केल्याचे सांगून भविष्यात मोठे प्रकल्प करण्याचे संकल्प असल्याचे सांगितले. तर रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष गनिभाई मेमन यांनी जीवनात पैसा, ऐश्वर्य याला काहीही किंमत नसून मानवता धर्मच मोठा असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी कोविड काळात मृत्यू झालेल्यांची उदाहरणे दिली.
वर्षभरात विकासकामे करणार : मुख्याधिकारी
मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार यांनी शहरात रस्ते, लाईट, पाणी आदींबाबत काहीही विकास झालेला नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त करून नगरपालिकेत निधी शिल्लक असल्याने वर्षभरात भरपूर कामे करणार असल्याचे सांगितले.तसेच रोटरीचे सहा तत्व सांगून त्यात स्वच्छता, शिक्षण आदी कामे असून ती नगरपालिकेला पूरक असल्याचे सांगितले. उपविभागीय पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी आपल्या मनोगतात कोविड योद्ध्यांचा गौरव केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. भुसावळ येथे बदली झाल्यावर हे गुंडगिरीचे शहर असल्याचे ऐकले होते परंतु येथील कोरोना योद्धा तसेच रोटरीमधील विविध क्षेत्रातील लोकांचा परीचय ऐकल्यावर हे सुसंस्कृत, साहसी व गुणी लोकांचे शहर असल्याची खात्री पडल्याचे सांगितले. नवीनच हजर झालेल्या डी. वाय.एस पी. सोमनाथ वाकचौरे व मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार यांनी शहरात हजर झाल्यावर आजचा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम समाजसेवी लोकांसोबत झाल्याने आनंद झाल्याचे खास बोलून दाखवून रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्सच्या उपक्रमांचे कौतुक केले. सूत्रसंचालन प्रा.रो. गिरीष कुलकर्णी व रो.अरुण मांडळकर यांनी केले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमाला शहरातील विविध रोटरी व रोटरॅक्त क्लब चे अध्यक्ष, पदाधिकारी, डॉ.राजेश मानवतकर, जय गणेश व अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व विविध समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी, रॉयल्स क्लब चे प्रसन्न पांडे, गणेश फेगडे, धीरज धांडे, महेश फालक, राजेश पोतदार, विरेंद्र पाटील, चैत्राम पवार, लोकेश कंसल, अनुपसिंग ठाकूर, निलेश मुळे, भुपेंद्र शर्मा, सूचित सुराणा, सौरभ अग्रवाल, सर्फराज तडवी, सतिष कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमात विनोद तायडे, विवेक विसपुते, अनंत वाटपडे, किरण ठाकूर, योगेश उबाळे, मोहन पाटील, धीरज मुळे, महेश झंवर, रोहित साहनी, लोकेश वाढे, सागर चव्हाण, मनोज माहेश्वरी, रोहित कोलते, प्रसाद धरणगावकर, राहुल वाघोदे, धीरज पाटील, गौरव कुसंबीवाल, आरिफ गवळी या नवीन सदस्यांनी रोटरी क्लब ऑफ भुसावल रॉयल्सचे सभासदत्व स्वीकारले.

