डॉ.नितु पाटील यांचे कार्य प्रशंसनीय : डॉ.अजित गोपछडे
उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीत विशेष सत्कार
भुसावळ : उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात भाजप वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ.नितु पाटील यांनी कार्यकारीणी जाहीर झाल्याबरोबर अल्पावधीतच विविध वैद्यकीय प्रश्नांबाबत प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला आहे तसेच संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्या वैद्यकीय आघाडीचा वेगळा ठसा उमटवला आहे, असे डॉ.नितु पाटील यांचे कार्य सराहनीय आहे, असे कौतुकास्पद उद्गार प्रदेश वैद्यकीय आघाडीचे मुख्य संयोजक डॉ.अजीतजी गोपछडे यांनी काढले.
उत्तर महारष्ट्रात संघटनात्मक चर्चा
भाजपच्या प्रदेश वैद्यकीय आघाडीतर्फे शनिवारी नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील डॉक्टरांची बैठक घेण्यात आली. यावेळी डॉ.गोपछडे पुढे म्हणाले की, कोरोना काळात डॉ.नितु पाटील यांनी आशा सेविका, पोलिस बंधू यांना हातमोजे वाटप, अन्नदान करणे विशेष म्हणजे कोरोना संक्रमित रुग्णांचे वाढदिवस साजरे करणे आणि त्यांचे मनोबल वाढविणे, असे विविध उपक्रम राबविले आहेत. आता आघाडीच्या वतीने मोहल्ला क्लिनिक सुरू करून गोरग-गरीबांना मोफत उपचार देण्यासंबंधी आणि इतर विविध कार्याबद्दल आणि उत्तर महारष्ट्रात संघटनात्मक चर्चा झाली.
यांची होती उपस्थिती
यावेळी डॉ.नितु पाटील यांचा विशेष सत्कार महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय आघाडीचे मुख्य संयोजक डॉ.अजीतजी गोपछडे यांच्या हस्ते झाला. यावेळी नाशिक भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ.प्रशांत पाटील, डॉ.भालचंद्र ठाकरे, डॉ.चंद्रशेखर नामपूरकर, डॉ.योगेश पाटील, डॉ.रघुनाथ नामपूरकर, जळगावमधील डॉ.नरेंद्र ठाकूर, डॉ.धर्मेंद्र पाटीलतसेच धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर येथील सर्व पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन विलास भदाणे यांनी केले.
जे जे तुमच्या मनात, ते ते आमच्या कार्यात…!
जळगाव जिल्हा वैद्यकीय आघाडीचे कार्य हे संपूर्ण महाराष्ट्रात उल्लेखनीय असे राहील. आगामी काळात प्रत्येक तालुकास्तरावर कार्यकारीणी तयार करून जळगावला वैद्यकीय आघाडीचा भव्य मेळावा घेण्यात येईल. वैद्यकीय क्षेत्रांतील प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्याद्वारे होईल, असे उत्तर महाराष्ट्र भाजप वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ.नितु पाटील म्हणाले.

