मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात डिजिटल एक्स रे मशीनचे लोकार्पण


मुक्ताईनगर : मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक सेवा देण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले असून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोमवारी अत्याधुनिक डिजिटल एक्स रे मशीनचे लोकार्पण करण्यात आले. मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात कोरोनासारख्या गंभीर संकट काळात कोरोना व्यतिरिक्त जास्तीत-जास्त सेवा रुग्णांना मिळाव्या सदैव प्रयत्नशील असलेले आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक सेवा पुरविणार्‍या यंत्र सामुग्री मिळविण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरू ठेवला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार जिल्हा नियोजन समिती (डी.पी.डी.सी.) निधी अंतर्गत 10 लक्ष मंजूर निधीतून अत्याधुनिक डिजिटल एक्स रे मशीन रुग्णांच्या सेवेत दाखल झाली. या डिजिटल एक्स रे मशीनचे सोमवारी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात लोकार्पण करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते विनोद तराळ, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनंतराव देशमुख, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, काँग्रेसचे अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीस आसीफ खान, अल्पसंख्यांक सेनेचे जिल्हा संघटक अफसर खान, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, काँग्रेस तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, भुसावळ शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, शहर संघटक वसंत भलभले, शहर प्रमुख गणेशजी टोंगे, राजेंद्र हिवराळे, काँग्रेस युवक शहराध्यक्ष पवन खुरपडे, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, नगरसेवक संतोष मराठे, माजी सरपंच रामभाऊ पुनासे, माजी उपसरपंच जाफर अली, सलीम खान, जहीर शेख, बी.डी.गवई, प्रभाकर पाटील, गोपाळ सोनवणे, बाळा भालशंकर, राजेंद्र तळेले, गणेश पाटील, दीपक पवार, शुभम शर्मा तसेच महाविकास आघाडीचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !