पिंपरूड रस्त्याची दुरवस्था थांबवा : आमदार शिरीष चौधरींना साकडे


फैजपूर : भुसावळ रोडवरील छत्री चौफुलीपासून पिंपरूड फाट्यापर्यंतचचा रस्ता अत्यंत खराब झालेला असून रस्ता दुरुस्त करण्यासंदर्भात आमदार शिरीष चौधरी यांना नगरसेवक केतन किरंगे, देवेंद्र बेंडाळेसह आदी कार्यकर्त्यांनी खिरोदा येथे जाऊन निवेदन दिले. आमदार चौधरी यांनी तत्काळ रस्ता दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले.

दोन किलोमीटर अंतराची दुरवस्था
गेल्या तीन वर्षांपासून फैजपूर येथील भुसावळ रोडवरील छत्री चौफुलीपासून पिंपरूड फाट्यापर्यंतच्या रस्त्यावरील डांबरीकरण रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या संपूर्ण दोन कि.मी.रस्त्यावर मोठ-मोठ खड्डे पडल्याने दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना मोठी कसरत करून वाहने चालवावी लागणार आहे शिवाय वाहनधारक मधुकर कारखानामार्गे भुसावळला जात आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेचा फटका विरोदा, वढोदा, पिंपरूड, करंजी या गावांना जाणार्‍या नागरीकांनाही सोसावा लागत आहे. दुचाकी, चारचाकी गाड्यांचे मोठे नुकसान होत असून तत्काळ भुसावळ रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी फैजपूर येथील नगरसेवक केतन किरंगे, देवेंद्र बेंडाळे, गटनेते कलिम मण्यार, मनोहर नेमाडे, काँग्रेस शहराध्यक्ष शे.रीयाज, मनोज पाटील, शेतकरी राजेश चौधरी आदींनी आमदार शिरीष चौधरी यांना खिरोदा येथे निवेदन देवून केली आहे. आमदारांनी तत्काळ रस्ता दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !