वंचित बहुजन आघाडी पदाधिकार्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास
मुक्ताईनगर : भाजपातून राष्ट्रवादीत दाखल झालेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दररोज सातत्याने राष्ट्रवादीत प्रवेश करणार्यांची संख्या वाढत आहे. सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष जितेंद्र जैन, विधानसभा क्षेत्र प्रमुख मधुसूदन सपकाळ, जिल्हा उपाध्यक्ष अमोल इंगळे ,राजेंद्र भाकरे, नारायण कुयटे आणि त्यांच्या शंभर कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगर येथे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे आणि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
काम घेवून येणार्याला पक्ष कधी विचारला नाही
यावेळी मार्गदर्शन करताना एकनाथराव खडसे म्हणाले की, राष्ट्रवादीत प्रवेश करणार्या सर्वांचे मी स्वागत करतो. गेल्या वेळी बुलढाणा जिल्ह्याचा पालकमंत्री असताना विकासाचे राजकारण केले. माझ्याकडे काम घेऊन येणार्या कार्यकर्त्याला त्याचा कधी पक्ष विचारला नाही हे पुर्ण बुलडाणा जिल्ह्याने अनुभवले आहे. माझ्याकडे असणार्या विविध खात्याच्या अंतर्गत असणार्या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा विकास निधी खेचून आणला त्यातुन विविध विकास कामे पार पडली, मलकापूर नांदुरा व इतर नगरपालिकासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून रस्ते व इतर विकास कामे मार्गी लावली तसेच संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून तत्काळ दुष्काळी मदत मिळवून दिल्याचे ते म्हणाले.
यांनी केला राष्ट्रवादीत
यावेळी निलेश टोंगळे, सोपान सपकाळ, शंकर उबाळे, संतोष पाटील, ओंकार वराडे, तुकाराम उबाळे, शुभम बोरसे, लक्ष्मण पवार, योगेश सांगळे, अंकुश लहासे, संतोष गोरे, विशाल घोडेस्वार, नारायण नाईक, सुरेंद्र नाईक, गणेश थिगळे, विनोद साबळे, संजय भालेकर, पंकज बस्सी, कैलास बस्सी, किशोर पडवाळ, नरेश बस्सी, नरेंद्र बस्सी, दीपक भोकन, कृष्णा चोपडे, शेखर पाटील, भूषण वानखडे, पृथ्वी राजपूत, विश्वपाल परमार, कैलास जाधव, जयसिंग जाधव, अनंता सोनागे, तुळशीराम उबाळे, संजय गिराळ, रमेश शिवणेकर, बाबूराव वाकोडे, प्रमोद तोमर, रामरतन उकार्डे, दशरथ जाधव, प्रथमेश शिराळ, ईसाकभाई मुनाफ पटेल, शे.अफसर शे.रज्जाक उर्फ राजु मेंबर, शे.सादिक शे.करामत, साजीद वहाब पटेल, वसंत जगताप या प्रमुख कार्यकर्त्यांसह शंभर जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, शहाद्याचे माजी आमदार उदेसिंग पाडवी, डॉ.तुषार सनांसे, माधव पाटील, विलास धायडे, अनिल वराडे, निलेश भाऊराव पाटील, शिवराज पाटील, बापू ठेलारी, राहुल पाटील, अभय देशमुख, पांडुरंग नाफडे उपस्थित होते.

