आदिवासी भागातील रस्ते सुधारा : आदिवासी एकता मंचचे नवेदन


फैजपूर : आदिवासी भागातील बोरखेडा ते तिड्या अंधारमळी व मोहमांडली रस्त्याची दुर्दशा झाली असून रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. रस्ते सुधारण्यासाठी आदिवासी एकता मंचतर्फे फैजपूर प्रांताधिकारी यांना दिले निवेदन देण्यात आले. आदिवासी भागातील बोरखेडा ते तिड्या, अंधारमळी व मोहमांडली या रस्त्याची दुरर्दशा फार वाईट झाली आहे. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून या तीन्ही गावात शंभर टक्के आदिवासींचा रहिवासी आहे. दवाखाने, बाजार, शाळा कॉलेज या सुविधा सर्व फैजपूरला आहे व फैजपूर जाण्यासाठी एकमेव हाच एक रस्ता आहे मात्र तोही खराब असल्यामुळे स्थानिकांचे हाल होत आहेत. हा रस्ता मंजूर आहे किंवा नाही व मंजूर असेल तर रस्त्याचे काम का केले नाही ? याविषयी चौकशी करावी व आदिवासी बांधवांचे समस्या सोडवावी अन्यथा आदिवासी एकता मंच (महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. निवेदन देतांना आदिवासी एकता मंचचे जिल्हा संघटक रब्बील तडवी, यावल तालुकाध्यक्ष सरदार तडवी, मुस्तफा अरमान तडवी, जहांगीर सिकंदर तडवी, फरीद शवखा, जावेद फकीर, समीर मोहंमद तडवी व पदाधिकारी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !