दुचाकी चोरटा भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात


भुसावळ : बुलढाणा जिल्ह्यातील दुचाकी चोरट्याच्या भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळत त्याच्या ताब्यातून चोरलेली 30 हजार रुपये एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सचिन उर्फ (रामु) जनार्दन घुले (19, रा.गाव भोटा, ता.शेगाव जि.बुलढाणा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 31 ऑक्टोबर रोजी तक्रारदार लिलाधर दगडु झांबरे (55, रा.विठ्ठल मंदिर वॉर्ड, कुकरेजा शॉपजवळ, भुसावळ) यांनी राहत्या घरजवळून होंडा कंपनीची 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्याने लांबवली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होता. सोमवारी संशयीत आरोपी भुसावळातील रेल्वे स्टेशन परीसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली व चोरीची दुचाकी त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, हवालदार जयराम खोडपे, कृष्णा देशमुख, रवींद्र बिर्‍हाडे, किशोर महाजन, रमण सुरळकर, विकास सातदिवे, सचिन चौधरी, चेतन ढाकणे, सुभाष साबळे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, बंटी कापडणे आदींनी केली. तपास एएसआय अनिल अडकमोल करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !