बिहार निवडणुकीतील भाजपा विजयाचा भुसावळात जल्लोष
भाजपेयी मात्र माजी मंत्री खडसे समर्थकांनी जल्लोषाकडे फिरवली पाठ
भुसावळ : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि बिहार निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने बिहार, उत्तर प्रदेश, गुजराथ, तेलंगणा, मणिपूर, कर्नाटक, झारखंड, मिझोरम आणि मध्य प्रदेशमध्ये ऐतिहासिक निकाल देत भाजपावर विश्वास दर्शवल्याने या ऐतिहासीक विजयाचा बुधवारी सकाळी जामनेर रोडवरील आमदार संजय सावकारे यांच्या कार्यालयाबाहेर भाजपा पदाधिकार्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. दरम्यान, भाजपाच्या या कार्यक्रमाला भाजपा असलेले मात्र माजी मंत्री खडसे समर्थक असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोषाकडे फिरवलेली पाठ चर्चेचा विषय ठरली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी नगरसेवक युवराज लोणारी, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, नगरसेवक पिंटू कोठारी, नगरसेवक महेंद्र ठाकूर, नगरसेवक निक्की बत्रा, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, माजी नगरसेवक संतोष बारसे, अजय नागरानी, मुकेश पाटील, राजेंद्र नाटकर, गिरीष महाजन, सतीश सपकाळे, शैलजा पाटील, अजय भोळे, वासु बोंडे, शेखर इंगळे, खुशाल जोशी, प्रवीण इखणकर, लल्ला देवकर, प्रा.प्रशांत पाटील, भुसावळ शहर सरचिटणीस अमोल महाजन, पवन बुंदेले, तालुका सरचिटणीस दिलीप कोळी, बिसन गोहर, नंदू बडगुजर, अर्जुन खरारे, गौरव लोणारी, अमित असोदेकर, चेतन बोरोले, शंकर शेळके, विशाल जंगले, शिशिर जावळे, शेखर पाटील, नारायण रणधीर, सुरेश कुटे, निखील वायकोळे, सदानंद उन्हाळे, जितेंन्द्र कोळी, अरुण इंगळे, अनिरुध्द कुलकर्णी, चेतन सावकारे, नरेंन्द्र बर्हाटे, राजु चंदन आदी पदाधिकारी उपस्थित होते.

