चिंचोलीत 30 वर्षीय तरुणाची गळफास घेवून आत्महत्या
यावल : तालुक्यातील चिंचोली येथील दीपक गोविदा कोळी (30) या तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. वेल्डींग दुकानात काम करून उदरनिर्वाह करणार्या दीपकला दारू प्राशनाची सवय असल्याचे समजते. बुधवारी बसस्थानकामागील काशीनाथ दामोदर मोरे यांचे शेताच्या बांधावरील भोकरच्या झाडाला प्लास्टिकचे दोरीने गळ्यास त्याने गळफास घेत आत्महत्या केली. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन केले. या बाबत यावल पोलिसात गोपाळ बळीराम कोळी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार नागपाल भास्कर करीत आहेत.

