साकळीत दुचाकी अपघातात तिघे जखमी
यावल : दुचाकीसमोर अचानक कुत्रा आल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले. बुधवारी दुपारी दिड वाजेच्या साकळी बसस्थानकाजवळ हा अपघात झाला. या अपघातात मुस्तफा छब्बीर तडवी (24), शहानूरबी अजित तडवी (70) व समीना मुबारक तडवी (14) हे जखमी झाले असून तिघांवर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावर किनगावकडून यावलकडे दुचाकीव्दारे तिघे येत असताना बुधवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास साकळी बसस्थानकाजवळ दुचाकीसमोर अचानक कुत्रा आल्याने दुचाकीस अपघात झाला. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला, अधिपरीचारीका आरती कोल्हे, पिंटू बागुल आदींनी उपचार केले.

