प्रेयसीसाठी पत्नीसह मुलांना घराबाहेर काढलेे : तिघांविरुद्ध गुन्हा
जळगाव : प्रेयसीसाठीपत्नी व मुलांना बाहेर काढणार्या पतीसह तिघांविरुद्ध जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील बांभोरी नाक्याजवळ राहणार्या विवाहितेने तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या पतीचे शेतीपयोगी साहित्य विक्री करण्याचे दुकान असून लग्नात 50 हजार रुपये, अंंगठी, टोंगल, टॉप्स व मंगलपोत असे दागिने वडिलांनी दिले तर कुटुंबातून विभक्त झाल्यानंतर माहेरावरून दीड लाख रुपये आल्यानंतर दाम्पत्याच्या नावावर घर झाले. काही दिवसांपासून एक महिला त्यांच्या घरी यायची. पतीला तिच्याबाबत विचारल्यानंतर नातेवाईक असल्याचे सांगत होता. मात्र, त्या दोघांचे फोटो पत्नीच्या निदर्शनास आले. त्यानंतर दोघांच्या संसारात वितुष्ट यायला सुरुवात झाली. त्या महिलेने सासूला या प्रकाराबाबत सांगितले. हा प्रकार सांगितल्यानंतर सासूने छळ करण्यास सुरुवात केली. 23 ऑक्टोबर रोजी पती व सासूने अंगावरील दागिने काढून घेतले. दोन मुलांसह त्या विवाहितेला घराबाहेर हकलले. पतीच्या प्रेयसीने तिला शिविगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी त्या विवाहितेच्या फिर्यादीवरुन सासू, पती व त्याची प्रेयसी या तिघांविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात घर घेण्यासाठी दीड लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैसे न दिल्याने छळ करुन अंगावरील दागिने काढून घराबाहेर हकलून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

