रावेरात किरकोळ कारणावरून दोघांना मारहाण : तिघांविरुद्ध गुन्हा


रावेर : किरकोळ कारणावरून दोघांना शिविगाळ करत तिघांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. शेख आसीफ शेख सत्तार (30, रा.कुरेशी वाडा, रावेर) आणि महम्मद फारूख महम्मद इकबाल हे दोघे बुधवारी सकाळी 7 ते 7.30 वाजेच्या गप्पा मारत असतांना वाड्यातील शेख नदीम शेख नजीर (27), शेख नफिस शेख नसीर (28) आणि शेख मुस्तक शेख इसाक (29, तिघे रा.कुरेशी वाडा) यांनी काहीही कारण नसतांना शेख आसीफ आणि फारूख यांना शिवीगाळ करून मारहाण केली तसेच दोघांवर विटा मारल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर शेख नदीम आणि शेख नफिस या दोघांना अटक करण्यात आली असून इस्माईल शेख तपास करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !