भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये नॉन कोविड रुग्णांना मिळणार सेवा


डॉ.नितु पाटील यांच्या पाठपुराव्याला आले यश : रुग्णांना दिलासा

भुसावळ : भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये नॉन कोविड रुग्णांना सेवा देण्यासह ग्रामीण रुग्णालयात कोविड संशयीत व संक्रमित रुग्णांना सेवा द्यावी तसेच भुसावळातील रेल्वे रुग्णालयात कोविड केंद्र तात्पुरत्या स्वरूपात बंद करून रुग्णांना डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात स्थलांतरीत करावेत, असे आदेश जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.नागोराव चव्हाण यांनी काढले आहेत. या संदर्भात भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नितु पाटील यांनी तक्रार केली होती. या तक्रारीच्या पाठपुराव्याला यश आल्याने समाधान व्यक्त होत आहे.

डॉ.नितु पाटील यांच्या पाठपुराव्याला आले यश
भुसावळातील ट्रामा केअर सेंटरची पूर्ण वास्तू केवळ कोरोना चाचणीसाठी वापरण्यात येत असून शहरात रुग्ण संख्या सध्या घटली असून संपूर्ण इमारत त्यासाठी अडकवणे संयुक्तीक नाही शिवाय कोरोना तपासणी ग्रामीण रुग्णालयातदेखील करता येणे असल्याने तसे झाल्यासे कोविड सोडून अन्य आजारी रुग्णांची गैरसोय टळेल शिवाय त्यांच्यावर ट्रामा सेंटरमध्ये उपचार झाल्यास ते सोयीचे ठरणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या तक्रारीत डॉ.पाटील यांनी म्हटले होते. या निवेदनाची दखल घेत ट्रामा सेंटरमध्ये कोविड रुग्णांवर उपचार करण्याचे आदेश मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

भाजपा आघाडीचा यशस्वी पाठपुरावा
या आदेशामुळे ग्रामीण भागातील रुग्ण आणि पोलिस बांधवांचे होणारे त्रास वाचणार आहेत त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात रुग्णांना दिलासा मिळणार आहे. भाजप भाजप वैद्यकीय आघाडीचा हा यशस्वी पाठपुरावा असल्याचे भाजप वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नितु पाटील म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !