जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 30 रुग्ण आढळले


जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 53 हजार 697 वर : एकाच दिवसात 67 रुग्णांची कोरोनावर मात

जळगाव : जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाचे 30 रुग्ण आढळले. त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे असून आतापर्यंत कोरोनामुळे 1274 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून गेल्या 24 तासात भडगाव तालुक्यातील 73 वर्षीय एका कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू ओढवला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 53 हजार 697 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 51 हजार 981 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर गुरूवारी एकाच दिवसात 67 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची कमी होणार्‍या रुग्ण संख्येमुळे समाधान व्यक्त होत आहे.

गुरूवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 03
जळगाव ग्रामीण 01
भुसावळ 01
अमळनेर 03
चोपडा 00
पाचोरा 00
भडगाव 00
धरणगाव 01
यावल 02
एरंडोल 00
जामनेर 14
रावेर 00
पारोळा 00
चाळीसगाव 00
मुक्ताईनगर 00
बोदवड 05
अन्य जिल्हा 00




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !