भुसावळातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्‍वास


पोलिस उपअधीक्षकांसह निरीक्षकांची कारवाई

भुसावळ : शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी कंबर कसली आहे. गुरुवारी स्वतः त्यांच्या बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी खडका रोड परीसरात पायी गस्त घालत वाहतुकीला अडथळा ठरण्यास कारणीभूत ठरणार्‍या दुकानदारांवर कारवाई केली तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघण करणार्‍या दुचाकीस्वारांवर कारवाई केली. गेल्या अनेक महिन्यानंतर या भागात कारवाई झाल्यानंतर रस्त्यांनी मोकळा श्‍वास घेतल्याने दुकानदारांनी समाधान व्यक्त केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !