गोरगरीबांच्या चेहर्‍यावरील आंनद हीच खरी दिवाळी


जनसंग्रामच्या उपक्रमात प्रशासक खेकारे यांच्या भावना

खिर्डी : गोरगरीब, गरजू व वंचितांच्या चेहर्‍यावर फुललेला आनंद हीच खरी दिवाळी असून जनसंग्रामचा समाजोपयोगी उपक्रम स्तुत्य असल्याची भावना निंभोरा ग्रामपंचायतीचे प्रशासक जी.एम.खेकारे यांनी व्यक्त केली. येथे जनसंग्राम संघटनेच्या वतीने सालाबादप्रमाणे सहाव्या वर्षी गावातील कष्टकरी मात्र दिवाळीच्या आनंदापासून वंचित राहणार्‍या घटकांतील पाचशे कुटुंबीयांना मिठाई, साड्या व लहान मुलांना कपडे वाटप करण्यात आले. यावेळी खेकारे बोलत होते.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनसंग्राम बहुजन लोकमंच सामाजिक संघटनेचे संस्थापक व येथील माजी उपसरपंच विवेक ठाकरे होते. प्रमुख अतिथी ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष दीपक मांडोळे, सुधाकर पुना भंगाळे, सचिव मनिषा ठाकरे यांच्याहस्ते साहित्य वाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
जाऊबाई महाले, छाया मोरे, गयाबाई मोरे, सुशीला भालेराव, सुमन मोरे, सुमन महाले, कविता महाले, संजीवनी मोरे, मनीषा महाले, संगीता सन्यास, पद्माबाई रामसिंग मोरे, अफरोजबी शेख, सराबाई लहासे, फाताबी शेख, निर्मला तायडे, कालाबाई पटेल, ध्रुपताबाई बिर्‍हाडे, निर्मला सपकाळे, सलीमा पटेल, संगीता पोहेकर, सुशीलाबाई पाटील, शबानूर पटेल, फातीबी पटेल, रेखा तायडे, रमाबाई सपकाळे, पदमबाई महाले, सिंधुबाई उमक, नलुबाई सपकाळे, मथुराबाई निंभोरे, शकीलाबी शेख, सिंधु चिमणकारे, मुन्नीबाई शेख, विमला गाढे, सीमा दिलीप तायडे, लताबाई तायडे, सुमनबाई महाले, लता पंडित महाले, चंद्राबाई निंभोरे, सलीमाबी शेख, अमिनाबी शेख, अमृत मुनाफ शेख, नजमाबाई इस्माईल शेख, मीनाबाई गाढे, आशा मोरे, नीता तायडे, रंभाबाई वाघ, सीमा तायडे, रूखमा पंडित महाले आदी महिला भगिनी उपस्थित होत्या. प्रास्ताविक भारतीय राष्ट्रीय युवा परीषदेच्या जिल्हा समन्वयक धनश्री ठाकरे तर आभार समन्वयक दस्तगीर खाटीक यांनी मानले. मुज्जफर खाटीक, चेतन बोरनारे, संदीप मोरे, शाकिर खाटीक, इसाक पटेल, अभिजीत मोरे, निलेश लोखंडे, अतुल मोरे, मुश्ताक पटेल, अल्ताब पटेल आदींनी यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !