रेल्वे प्रवाशांना दिलासा : कानपूर-बरौनीसाठी विशेष गाड्या


रेल्वे प्रवाशांची दिवाळीत टळणार गैरसोय : आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच मिळणार प्रवेश

भुसावळ : आगामी दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रवाशांची गैरसोय टळण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस-बरौनी त्री-साप्ताहिक वातानुकूलित उत्सव विशेष गाडी तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस-कानपूर सुपरफास्ट उत्सव विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. आरक्षित तिकीट असलेल्या रेल्वे प्रवाशांनाच या गाड्यांमध्ये प्रवेश मिळणार असून कोविडच्या पार्श्‍वभूमीवर शासन नियमांचे पालन प्रवाशांना बंधनकारक असणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस-बरौनी त्री-साप्ताहिक एक्स्प्रेस
अप 02585 त्री-साप्ताहिक वातानुकूलित उत्सव विशेष एक्स्प्रेस 13 ते 30 नोव्हेंबरदरम्यान दर सोमवार, मंगळवार आणि शुक्रवारी बरौनी येथून 7.40 वाजता सुटल्यानंतर तिसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पाच वाजता पोहोचणार आहे. डाऊन 02586 त्री-साप्ताहिक वातानुकूलित उत्सव विशेष गाडी 15 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरदरम्यान दर रविवार, बुधवार आणि गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनसहुन 11.20 वाजता सुटल्यानंतर बरौनीला दुसर्‍या दिवशी 9.30 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, पाटलीपुत्र, मुझफ्फरपूर आणि समस्तीपूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला 16 तृतीय वातानुकूलित बोगी जोडण्यात येणार आहेत.

लोकमान्य तिलक टर्मिनस-कानपुर सुपरफास्ट एक्स्प्रेस
अप 04153 साप्ताहिक सुपर-फास्टफास्ट उत्सव विशेष गाडी 12 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान दर गुरूवारी कानपुर स्टेशनहुन 9.20 वाजता रवाना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी 12.05 वाजता लोकमान्य तिलक टर्मिनस स्टेशनवर पोहोचणार आहे. डाऊन 04154 डाउन साप्ताहिक सुपर-फास्ट उत्सव विशेष 13 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरदरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनहुन दर शुक्रवारी 1.40 वाजता रवाना होईल आणि दुसर्‍या दिवशी 3.30 वाजता कानपूर स्थानकार पोहोचणार आहे. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज और फतेहपूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक एसी टू टीयर, आठ एसी थ्री टीयर, सात स्लीपर क्लास, चार सेकंड क्लास सीटिंग बोगी जोडण्यात येणार आहे.

रेल्वे प्रवाशांना आरक्षण गरजेचे
02586 या संपूर्णतः आरक्षित त्री-साप्ताहिक वातानुकूलित उत्सव विशेष गाडीचे विशिष्ट शुल्कासह आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि ुुुरेल्वेच्या संकेतस्थळावर 13 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि 04154 या संपूर्णतः आरक्षित लोकमान्य तिलक टर्मिनस-कानपुर सुपरफास्ट उत्सव विशेष गाडीचे विशिष्ट शुल्कासह आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर 12 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. केवळ आरक्षित् तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची परवानगी असणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !