बाहेरगावी जाताना मौल्यवान दागिने सांभाळा ; कोरोना टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा


निंभोरा पोलिसांतर्फे अप्रिय घटना रोखण्यासाठी गावात प्रभावी जनजागृती

खिर्डी : दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बहुतांश नागरीक बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरटे आपला डाव साध्य करीत असल्याने अप्रिय घटना रोखण्यासाठी निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी प्रभावी जनजागृती सुरू केली आहे. पोलिस वाहनावरील ध्वनीक्षेपकाद्वारे नागरीकांमध्ये प्रबोधन केले जात आहे. बाहेरगावी जाताना घरातील मौल्यवान दागिने व रोकड बँकेत ठेवावी तसेच कोरोना टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच सोशल डिस्टन्स बाळगण्यासह मास्कचा नियमित वापर करण्याबाबत आवाहन केले जात आहे.

निंभोरा पोलिसांकडून प्रभावी जनजागृती
कोरोनाचे संकट टळलेले नसल्याने नागरीकांनी बाजारपेठेतील गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यता टाळावे, अत्यावश्यक असल्यास तोंडाला मास्क बांधून सोशल डिस्टन्सचे पालन करावे, सुट्टीच्या काळात बाहेरगावी जाताना घराला उच्च दर्जाचे कुलूप लावावे तसेच सीसीटीव्ही असल्यास डीव्हीआर सुरक्षित ठिकाणी ठेवावा, अलार्म सिस्टीमचा वापर करावा तसेच घरातील जास्तीची रोकड व मौल्यवान दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत, बाहेरगावी जाताना स्थानिक पोलिसांना सूचित करावे शिवाय दिवाळी सणाच्या अनुषंगाने व कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या आवाजाच्या फटाक्यांचा वापर टाळावा तसेच प्रदूषण निर्माण करणारे फटाक्यांचा वापर करू नये, गर्दी निर्माण होऊन सार्वजनिक स्वास्थास धोका निर्माण होईल अशा कोणत्याही प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन करू नये, पारंपरीक पद्धतीने यावर्षी सुद्धा दिवाळी सण साजरा करावा, आपल्या बँक खात्यासह लॉकर, एटीएम, क्रेडिट कार्ड, फोन पे, गुगल पे बाबत माहिती कोणाजवळ उघड करू नये, रोख रक्कम अथवा मौल्यवान वस्तू/दागिने ने आण करतांना दक्षता घ्यावी तसेच शक्यतो एकटे व रात्रीच्या वेळेस प्रवास करू नये, गावी जातांना आपली वाहने घरीच असल्यास ती वॉल कंम्पाऊडचे आत लॉक करून अथवा साखळीने कुलूपबंद करावी, गावी जातांना कॉलनी अथवा परीसर मिळून एखाद्या वॉचमनची नियुक्ती करावी किंवा विश्वासातील व्यक्तीस रात्रीच्या वेळी घरी थांबण्याची सूचना करावी, गावात कोणीही दागिने पॉलिश करून देतो, अशी बतावणी करणारे लोक आल्यास सावध रहावे तसेच पोलिसांना सूचित करावे व कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारची खाद्य पदार्थ वस्तू घेऊ नये व गावात कोणीही अनोळखी व्यक्ती आढळल्यास त्याबाबत पोलिस ठाण्याशी 02584-280361 वर संपर्क करावा, असे आवाहन सहा.निरीक्षक स्वप्नील उनवणे मार्गदर्शनाखाली पोलीस वाहनातून पोलिस स्टेशन हद्दीमधील गावा-गावात ऑडिओ क्लिपद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !