अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे सातपुड्यात 450 जणांना फराळासह नवीन कपडे वाटप


सातपुड्यातील जामुनझिरा येथे राबविला उपक्रम : मदतीसाठी सरसावले अनेक हात

भुसावळ : भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे यावल तालुक्यातील जामुनझिरा येथे सामूहिक दिवाळी साजरी करण्यात आली. त्यात 125 कुटुंबातील मुला-मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या, शैक्षणिक साहित्य,स्वच्छते साठी साबण आणि जिल्हा परीषद शाळेसाठी आरो (वाटर पुरीफायर) वाटप करण्यात आले. दीपोत्सवाच्या निमित्ताने अंतर्नादतर्फे ‘एक वाटी फराळ व नवीन कपडे द्या आणि वंचितांची दिवाळी गोड करू या’ असे आवाहन करण्यात आले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांतर्गत गोळा करण्यात आलेले साहित्य व फराळ यावल तालुक्यातील जामुनझिरा येथील आदिवासी पाड्यात वाटप करण्यात आला.

यांनी केले उपक्रमासाठी सहकार्य
विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रवींद्र निमाणी, नगरसेवक मुकेश पाटील, नगरसेवक युवराज लोणारी, दिलीप सूर्यवंशी, प्रशांत तायडे, निलेश कोल्हे, ललित पाटील, हर्षद महाजन, किशोर पाटील, रघुनाथ सोनवणे, डॉ.नीलिमा नेहते, हरीश फालक, रमेश सरकटे, कांतीलाल पाटील, दशरथ पाटील, मंगलेश पाटील, श्रीकांत मोटे, ज्योती साठे, सरला पाटील, सुरेश न्हावकर, भाग्यश्री भंगाळे, सचिन पाचपांडे, रवी राजपूत, परीक्षीत बर्‍हाटे, प्रकाश कासार, क्रांती सुरवाडे, ज्ञानेश्वर मोरे, एच.टी.फेगडे, परीक्षीत चव्हाण, सलीम शेख, जे.डी.महंत, विजय सोनवणे, बी.एन.पाटील, पवन कलापुरे, नरेंद्र पाटील, महेंद्र किनगे, विकास वारके, सदीप पाटील, विलास बेंद्रे, दिलीप चौधरी, मयुर कोळी, शरद हिवरे, शरद गाढे, संदीप बोरोले, शशिकांत राणे, वसंत सोनवणे, प्रवीण पाटील, गिरीराज फेगडे, दीपक महाराज, छाया पाटील, दीपक जावळे, विनोद चोरडीया, के.टी.तळेले या दात्यांचे सहकार्य लाभले. प्रकल्प प्रमुख योगेश इंगळे समन्वयक जीवन सपकाळे तर सह समन्वयक हरीश भट हे होते.

यांची होती उपस्थिती
श्रीकांत जोशी, ज्ञानेश्वर घुले, देव सरकटे, प्रसन्ना बोरोले, शशिकांत येवले, आरीफ तडवी, पांडुरंग महाजन, गणेश जावळे, समाधान जाधव, प्रदीप सोनवणे, जीवन महाजन, प्रा.श्याम दुसाने, संजय भटकर, निवृत्ती पाटील, भूषण झोपे, मंगेश भावे, अमित चौधरी, अमितकुमार पाटील, कुंदन वायकोळे, राजू वारके, हेमंत बोरोले, राजेंद्र जावळे, सचिन पाटील, तेजेंद्र महाजन, संदीप सपकाळे अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर फुलले हास्य
अंतर्नादतर्फे गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे.पाड्यावरील चिमुकल्यांना नवे कपडे मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले होते. वाड्या-वस्त्यांवरील कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केल्याचा आनंद हा शब्दातीत आहे, अशी भावना अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केली.

उप्रकाला मिळाले व्यापक स्वरुप
‘वाटीभर फराळ आणि कपडे द्या’ या उपक्रमाला यंदा दात्यांकडून जोरदार प्रतिसाद लाभला. त्यामुळे त्यास व्यापक स्वरुप मिळाले. भविष्यात हा उपक्रम लोकचळवळ व्हावा, या अनुषंगाने प्रयत्न करू, अशी ग्वाही प्रकल्पप्रमुख योगेश इंगळे, समन्वयक जीवन सपकाळे, सह समन्वयक हरीश भट यांनी दिली. शहरी लोक पाड्यावर एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात याचा आनंद असल्याची भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !