भुसावळात दगड फेकून मारल्याने एक जण जखमी
भुसावळ : जुना वाद उफाळून आल्याने एकाने दगड मारल्याने एकाचे डोके फुटले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अविनाश डोंगरदिवे हे वडीलांचा डबा देऊन घरी जात असतांना 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आकाश उर्फ गेर (रा. भारत नगर, भुसावळ) याने रस्त्यावरील दगड फेकून मारल्याने डोंगरदिवे जखमी झाले. त्याच्यावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय तथा हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात आले. उपचार करून परत आल्यावर गुरूवारी रात्री फिर्याद दिल्यावरून संशयीत आरोपी आकाशविरूध्द बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हवालदार तुषार पाटील पुढील तपास करीत आहेत.

