राज्य भरातील कंत्राटदाराची दिवाळी अंधारात


तीन लक्ष कंत्राटदारांची हजारोची कोटींची बिले अडकली शासनाकडे

भुसावळ : राज्यभरातील सुमारे तीन लाख कंत्राटदारांची यंदाची दिवाळी अंधारातच गेली. कोरोनाचे कारण पुढे करीत गेल्या आठ महिन्यांपासून कंत्राटदारांना शासनाने बिले न अदा केल्याने कंत्राटदारांसह त्यांचे कुटुंबीय संकटात सापडले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, शासनाकडे काम करणार्‍या सर्वच विभागाकडे कामे करणार्‍या तीन लाख कंत्राटदारांची कोरोनाचे कारण पुढे करीत गेल्या आठ महिन्यांपासून शासनाने बिले काढलेली नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे साडेतीन कोटी, ग्रामविकास विभागाचे 750 कोटी, 2525 लेखा शीर्षकाचे 400 कोटी, नगरविकास विभागाचे 2700 कोटी, जलसंपदा विभागाचे 615 कोटी अद्याप अदा न झाल्याने कंत्राटदार संकटात सापडले आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !