अज्ञात वाहनाच्या धडकेत खिर्डीच्या इसमाचा मृत्यू


खिर्डी : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने खिर्डी बु.॥ येथील रहिवासी जीवन भास्कर पाटील (41) यांचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. पाटील हे मधुकर सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी असुन ते आपल्या शेतातून परत येतांना चिंच फाटा ते अजंदा दरम्यान शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रावेर ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. संदीप अरुण पाटील यांच्या फिर्यादीवरुन निंभोरा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बापू पाटील करीत आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगी, पत्नी, आई वडील, भाऊ असा परीवार आहे. जीवन हे भास्कर सीताराम पाटील यांचे चिरंजीव तर प्रवीण पाटील यांचे मोठे भाऊ होत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !