कलबुर्गी-गुवाहाटी (वन-वे) विशेष गाड्या
भुसावळ : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने कलबुर्गी ते गुवाहाटी दरम्यान एकेरी विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
कलबुर्गी ते गुवाहाटी स्पेशल ट्रेन (वन वे)
02047 विशेष गाडी 16 रोजी 10.30 वाजता कलबुर्गीहुन सुटेल आणि चौथ्या दिवशी 19 रोजी पहाटे पाच वाजता गुवाहाटीला पोहोचेल. या गाडीला सोलापूर, दौंड, पुणे, लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ व खंडवा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दोन एसी थ्री टीयर, आठ स्लीपर क्लास, 12 जनरल सेकंड सिटींग बोगी जोडण्यात येणार आहेत. विशेष ट्रेनचे विशेष शुल्कासह बुकिंग 14 नोव्हेंबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व रेल्वेच्या संकेतस्थळावर सुरू करण्यात आले आहे. केवळ आरक्षित तिकीट असणार्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची परवानगी असेल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड 19 संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.

